
एसटीच्या 19 हजार 163 कर्मचाऱयांनी सोमवारी डय़ुटीवर हजेरी लावली असल्याने एसटीच्या राज्यभरातील 50 आगारांतून वाहतूक सुरू झाली असून सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार एसटीच्या 1086 गाडय़ा विविध मार्गांवर सोडण्यात आल्या. दरम्यान, एसटी महामंडळाने आज 1088 जणांना निलंबित केले असून एकूण निलंबित कर्मचाऱयांची संख्या 7,585 इतकी झाली आहे. तर आज 254 जणांची सेवा समाप्त केल्याने एकूण 1,779 जणांची सेवा समाप्त झाली आहे.
एसटीचे संपकरी आंदोलक आझाद मैदानातून हळूहळू घटत चालले असून डय़ुटीवर हजर होणारे कर्मचारी दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. एसटी महामंडळाचे 19 हजार 163 कर्मचारी डय़ुटीवर हजर झाले आहेत. त्यात प्रशासकीय विभागाचे 8 हजार 922, कार्यशाळेचे 5 हजार 442, चालक 2 हजार 549 तर वाहक 2 हजार 250 आदी कर्मचाऱयांचा समावेश आहे. सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार विविध मार्गांवर 1086 गाडय़ा चालविण्यात आल्या असून त्यात 822 साध्या, 197 शिवशाही, 67 शिवनेरी गाडय़ांचा समावेश होता.






























































