राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचे नाव बदलले; ‘अमृत उद्यान’ नावाने ओळखले जाणार

राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचे नाव बदलण्यात आवे आहे. आता हे गार्डन ‘अमृत उद्यान’ या नावाने ओळखले जाणार आहे. राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन सौंदर्यासाठी परिचित आहे. दरवर्षी येथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात. या उद्यानात 138 प्रकारचे गुलाब, 10 हजारपेक्षा जास्त ट्यूलिप बल्ब आणि 70 विविध प्रकारचे 5 हजारपेक्षा जास्त फुलांच्या प्रजाती आहेत.

राष्ट्रपती भवनातील हे उद्यान पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी सर्वसामान्य जनतेसाठी खुले केले होते. तेव्हापासून दरवर्षी ठराविक काळात हे उद्यान जनतेसाठी खुले करण्यात येते. 15 एकर परिसरात पसरलेल्या या उद्यानाचे निर्माण ब्रिटिशांच्या शासन काळात करण्यात आले होते. याच्या सौंदर्यामुळे राष्ट्रपती भवनचा आत्मा अशी या गार्डनची ओळख आहे. या गार्डनचा एक हिस्सा फक्त गुलाबांच्या विविध प्रजातींसाठी आहे. ब्रिटिश वास्तूरचनाकार सर एडवर्ड लुटियन्सने राष्ट्रपती भवनमधील मुघल गार्डनचे डिझाइन बनवले होते.

या गार्डनला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी सर्व रोपांजवळ क्यूआर कोड बसवण्यात येणार आहे. तसेच दररोज 20 जण येथे मार्गदर्श कम्हणून काम करणार आहेत. ते येथे येणाऱ्या पर्यटकांना विविध रोपे आणि फुलांची माहिती देणार आहेत.

माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आणि रामनाथ कोविंद यांच्या कार्यकाळात येथे चार गार्डन होते. आता त्यात वाढ करण्यात आली आहे. यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रपती भवनातील या उद्यानाला अमृत उद्यान असे नाव देण्यात आले आहे.

मुघल गार्डनचे अनेक भाग आहेत. त्यातील गुलाबांच्या प्रजातींचा महत्त्वाचा भाग आहे. तसेच डायवर्सिटी पार्क, हर्बल गार्डन, बटरफ्लाय,म्युजिकल फाऊंटन, सनकीन गार्डन, कॅक्टस गार्डन, न्यूट्रीशियन गार्डन आणि बायो फअयूल पार्कही आहेत. या उद्यानात ट्यूलिप, मोगरा-मोतिया, रजनीगंधा, बेला, रातराणी, जूही, चंपा, चमेली यासारख्या अनेक फुलांची रोप आणि फुले बघता येतात.