
आरआरआर सारखा हिट सिनेमा देऊन ग्लोबल स्टार बनलेला राम चरण नुकताच बाबा झाला आहे. त्याची पत्नी उपासनाने गोंडस मुलीला जन्म दिला आणि चाहत्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. तशीच आता त्याच्या मुलीविषयी एक बातमी समोर आली आहे. वृत्तानुसार, मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाने राम चरण याच्या चिमुकलीला सोन्याचा पाळणा भेट दिला आहे.
मीडिया वृत्तानुसार, नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांनी राम चरण याच्या मुलीच्या बारश्याला मोठी भेटवस्तू त्यांच्या घरी जाऊन दिली. सोन्याच्या या पालण्याची किंमत 1 कोटी रूपये बोलले जात आहे. हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य झाले आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
View this post on Instagram
राम चरण आणि त्याची पत्नी उपासना यांच्या मुलीला नामकरण सोहळा मोठ्या थाटामाटात झाला. ज्याचे फोटो उपासनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. मात्र तिने अजूनपर्यंत चिमुकलीचे नाव काय ठेवले याबाबत काहीच सांगितलेले नाही. रामचरण लग्नाच्या 11 वर्षानंतर वडिल झाला आहे. त्याचे लग्न 2012 साली उपासनान कामिनेनी हिच्या शी झाले. ती त्याची आधी मैत्रीण होती. शिक्षण घेत असताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि अखेर दोघांच्या कुटुंबांच्या परवानगीने त्यांनी लग्न केले.




























































