
गँगस्टर कायद्यांतर्गत मुख्तार अन्सारी यांना दोषी ठरवल्यानंतर आज उत्तर प्रदेशच्या एमएलए न्यायालयाने मुख्तार यांचा भाऊ बसपा खासदार अफजल अन्सारीलाही दोषी ठरवले आहे. त्यांना न्यायालयाने चार वर्षांची शिक्षा सुनावतानाच एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. न्यायालयाने शिक्षा जाहीर करताच पोलिसांनी तत्काळ अफजलला ताब्यात घेतले.
उत्तर प्रदेशच्या एमएलए न्यायालयाने याआधी तुरुंगात असलेल्या मुख्तार अन्सारी यांना गँगस्टर कायद्यांतर्गत दोषी ठरवत दहा वर्षांची शिक्षा आणि पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. उत्तर प्रदेशात मुख्तार आणि त्याचा भाऊ अफजल यांनी लोकांमध्ये दहशत निर्माण केली होती. त्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने 22 सप्टेंबर रोजी न्यायालयाने दोघांविरोधात आरोप निश्चित केले होते. त्यानुसार न्यायालयाने याआधीच मुख्तार अन्सारींना शिक्षा सुनावली होती.


























































