हळदीकुंकू समारंभात बक्षिसांची लयलूट, शिवसेना मुलुंड विधानसभेच्या वतीने आयोजन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुलुंड विधानसभेच्या वतीने महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला. विजेत्या महिलांना पारितोषिक तसेच दोन हजार महिलांना संक्रातीचे वाण देण्यात आले. उत्सवाची परंपरा जपणाऱया ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या सांस्कृतिक कार्यक्रमाने सोहळय़ाची रंगत वाढवली.

मुलुंड येथील छत्रपती संभाजी राजे सांस्कृतिक भवन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन मुंबई बँकेचे संचालक पुरुषोत्तम दळवी आणि रत्नमाला दळवी यांनी केले होते. उपनेते दत्ता दळवी, उपनेत्या विशाखा राऊत, ईशान्य मुंबई समन्वयक संजय पाटील, विभागप्रमुख आमदार रमेश कोरगावकर, आमदार सुनील राऊत, विभाग संघटक राजराजेश्वरी रेडकर, माजी नगरसेविका दीपमाला बडे, संगीता गोसावी, युवासेना कार्यकारी सदस्या राजोल पाटील यावेळी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपविभागप्रमुख दिनेश जाधव, नितीन चवरे, सीताराम खांडेकर, उपविभाग संघटक नंदिनी सावंत, विधानसभा संघटक यशोदा चंदनशिवे, शीला सोनवणे, अमोल संसारे, संजय जाधव, राजेश साळी, चंद्रकांत शेलार, आनंद पवार, प्राजक्ता साळवी, सायली सावंत, लता चोपा, प्रमिला घाणेकर, संगीता टेमकर, सुजाता इंगावळे, दक्षता ठाकूर यांनी पुढाकार घेतला.