
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईतील मुलुंड परिसरात एका महिलेचा एटीएम सेंटरच्या आत लैंगिक छळ करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा व्हिडीओ त्या तरुणीने ट्विटरवर टाकल्यानंतर पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली आहे.
मुलंड पूर्वेकडील एका एटीएममध्ये रात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली. सदर तरुणी रिक्षावाल्याला पैसे देण्यासाठी पैसे काढायला एटीएममध्ये आली होती. त्यावेळी त्या तरुणाने एटीएममध्ये घुसून त्या तरुणीशी बोलायचा प्रयत्न केला. मात्र तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले असता त्याने तिला त्याचे गुप्तांग दाखवले. त्याचवेळी त्या तरुणीने मोबाईलने त्या तरुणाचा व्हिडीओ काढला. त्यानंतर तो तरुण तोंड लपवत पळून गेला. या प्रकरणी तरुणीने तो व्हिडीओ ट्विट केल्यानंतर पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली असून त्याच्याविरोधात नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


























































