लसीकरण मोहिमेचा वेग वाढणार

मुंबईसह राज्यात सध्या कोरोना विरोधातील लढाईसाठी मोठय़ा प्रमाणात लसीकरणास प्राधान्य दिले जात आहे. या लसीकरण मोहिमेचा वेग वाढावा यासाठी मुंबई महापालिकेच्यावतीने शहरात विविध ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्यात येत आहे. यामुळे मुंबईतील लसीकरण मोहिमेला आणखीन बळ मिळणार आहे.

शिवसेना शाखा क्र. 215 च्या स्थानिक नगरसेविका अरुंधती अरुण दुधवडकर यांच्या प्रयत्नातून सहकारी विद्यामंदिर येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले असून यावेळी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, विभाग संघटिका जयश्री बाळळीकर, कोल्हापूर सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपविभाग प्रमुख सुजित राणे, शाखाप्रमुख सिद्धेश माणगावकर, सुप्रिया शेडेकर उपस्थित होते.

शिवडी येथील प्रबोधनकार ठाकरे सभागृहात लसीकरण केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी ऑनलाइन उपस्थिती दर्शविली. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, विभागीय नगरसेविका श्रद्धा जाधव, उपविभागप्रमुख गजानन चव्हाण, महानगरपालिकेचे उपायुक्त बालमवार आणि गजानन बल्लाळ उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या