राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील विभाग क्र. 12 मधील मुंबादेवी, मलबार हिल, कुलाबा या विधानसभेतील युवासेना (युवती) पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱ्याचे काम बघून कायम करण्यात येणार आहेत.
कुलाबा विधानसभा – युवती
विभाग युवती अधिकारीपदी पायल ठाकूर, विधानसभा समन्वयकपदी रुची वाडकर, विधानसभा चिटणीसपदी ज्योती कांबळे यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. शाखा युवती अधिकारीपदी अनमोल बायराय (शाखा क्र. 221), उपशाखा युवती अधिकारीपदी मुग्धा मुंग (शाखा क्र. 221) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. शाखा युवती अधिकारीपदी मुस्कान चोरसिया (शाखा क्र. 222), उपशाखा युवती अधिकारीपदी नम्रता जग्णाल (शाखा क्र. 222), कृतिका जाधव (शाखा क्र. 222), जागृती कांदेरकर (शाखा क्र. 222), अस्मिता कांदेरकर (शाखा क्र. 222), प्राजक्ता शिवळे (शाखा क्र. 222), अक्षता वाडकर (शाखा क्र. 222) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
शाखा युवती अधिकारीपदी करुणा परमार (शाखा क्र. 224), शाखा युवती अधिकारीपदी नेहा शेख (शाखा क्र. 225), शाखा युवती अधिकारीपदी दीपिका कदम (शाखा क्र. 226), उपशाखा युवती अधिकारीपदी शर्मिता निकम (शाखा क्र. 226), शाखा युवती अधिकारीपदी अदिती पाल (शाखा क्र. 227) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
मुंबादेवी विधानसभा – युवती
विभाग युवती अधिकारीपदी दिव्या शेट्टी, विधानसभा समन्वयकपदी दिशा म्हेत्री, उपविभाग युवती अधिकारीपदी स्नेहा साळेकर (शाखा क्र. 220, 216), भावना मुत्याल (शाखा क्र. 213, 223), तर विधानसभा चिटणीसपदी नंदिनी चौरासिया (शाखा क्र. 220, 216), शारदा भिंगी (शाखा क्र. 213, 223) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. शाखा युवती अधिकारीपदी वनुजा उप्लानची (शाखा क्र. 213), ऋतुजा घुगे (शाखा क्र. 216), सिद्धी पाटील (शाखा क्र. 220), मयूरी म्हात्रे (शाखा क्र. 223), तर शाखा समन्वयकपदी हेतल राठोड (शाखा क्र. 213), चेत्रा पुत्रन (शाखा क्र. 216), किरण पवार (शाखा क्र. 220) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. उपशाखा युवती अधिकारीपदी अंजली शेट्टी (शाखा क्र. 213), अदिती अकंम (शाखा क्र. 213), अक्षता सोनावणे (शाखा क्र. 213), मनाली संत (शाखा क्र. 220), वैभवी सावंत (शाखा क्र. 220), प्राजक्ता गंभार (शाखा क्र. 220), ज्योती चौरासिया (शाखा क्र. 220), देवयानी शिर्सेकर (शाखा क्र. 220) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
मलबार हिल विधानसभा – युवती
विभाग युवती अधिकारीपदी लतीक्षा रामाणे, उपविभाग युवती अधिकारीपदी प्रेरणा उबाळे (शाखा क्र. 214, 215), अमिषा पिंपळे (शाखा क्र. 217, 218, 219), विधानसभा समन्वयकपदी नताशा कानडे यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. विधानसभा चिटणीसपदी मानसी पुजारी (शाखा क्र. 214, 215), प्रियंका सुतार (शाखा क्र. 217, 218, 219) तर विधानसभा उप-समन्वयकपदी कविता घाडी (शाखा क्र. 214, 215), कल्पना सकपाळ (शाखा क्र. 217, 218, 219) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
शाखा युवती अधिकारीपदी राणी पाठक (शाखा क्र. 214), वैशाली मुणगेकर (शाखा क्र. 215), धनिषा नगावेकर (शाखा क्र. 217), हर्षिता वर्वटकर (शाखा क्र. 218), रोहिणी जाधव (शाखा क्र. 219) यांच्या तर शाखा समन्वयकपदी साक्षी मोरे (शाखा क्र. 214), मानसी कदम (शाखा क्र. 215), दीपाली गुजर (शाखा क्र. 219) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. उपशाखा युवती अधिकारीपदी साक्षी डांगे (शाखा क्र. 214), करिना सातकर (शाखा क्र. 215), रजनी जाधव (शाखा क्र. 215), पूजा जोशी (शाखा क्र. 215), रश्मी घाडी (शाखा क्र. 215), ऋता शिद्रूक (शाखा क्र. 215), प्रगती मेघे (शाखा क्र. 215), रेश्मा पवार (शाखा क्र. 215), रविना पवार (शाखा क्र. 215), जागृती परदेशी (शाखा क्र. 219), जान्हवी महाडिक (शाखा क्र. 219), साक्षी सोन्घारे (शाखा क्र. 219), पूजा गुजर (शाखा क्र. 219), लिशा जैन (शाखा क्र. 219), सुगंध सिंग (शाखा क्र. 219) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्याचे युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.


























































