
अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या पहिल्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर झाली. या फेरीत एकूण 59 हजार 322 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून यातील 35 हजार 314 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे काॅलेज अलॉट झाले आहे. मुंबईतील काही नामांकित काॅलेजमध्ये अद्यापही जागा शिल्लक असून विशेष फेरीत विद्यार्थ्यांना या काॅलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे.
पहिल्या विशेष फेरीसाठी 1 लाख 48 हजार 386 जागा उपलब्ध होत्या, तर 68 हजार 178 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी अद्याप 8 हजार 856 विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. काॅलेज अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये 4 हजार 487 विद्यार्थी आर्टस् शाखेचे, 35,423 विद्यार्थी काँमर्स शाखेचे, 18 हजार 819 विद्यार्थी सायन्स शाखेचे तर 593 विद्यार्थी एचएसव्हीसी शाखेचे आहेत.
आतापर्यंत 1 लाख 36 हजार प्रवेश
अकरावीच्या आतापर्यंत पार पडलेल्या पहिल्या तीन गुणवत्ता याद्यांमध्ये एकूण 1 लाख 35 हजार 466 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. शाखानिहाय झालेले प्रवेश खालीलप्रमाणे –
शाखा कोटा पहिली फेरी दुसरी फेरी तिसरी फेरी
- आर्टस् 3372 6650 2984 1277
- काॅमर्स 24,629 25,724 16,040 8569
- सायन्स 12,491 19,631 8511 4080
- HSVC 273 699 393 143
‘व्हेव्ज’ या टेनिस खेळाला समर्पित आणि कृष्णा केदार यांनी साकारलेल्या शिल्पाचे उद्घाटन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी झाले. वांद्रे येथील ऑटर्स क्लबसमोरील चौकात हे शिल्प उभारण्यात आले असून या कार्यक्रमाला टेनिसपटू लिअँडर पेस आणि त्यांची कन्या अयाना, नगरसेवक संजय अगलदरे आदी उपस्थित होते.


























































