मुंबईत दहीहंडी फोडताना 60 गोविंदा जखमी, एकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। मुंबई

देशभरात दहीहंडीची धूम सुरू असून मुंबईतही दहीहंडी उत्साहात साजरी होत आहे. याचवेळी दहीहंडी फोडताना मुंबईतील विविध भागात 60 गोविंदा जखमी झाले आहेत. यातील 40 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, सायन रुग्णालयात एका गोविंदाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.