मुंबईत 84 हजार किलो प्लॅस्टिक जप्त, दंडापोटी आकारले 4 कोटी 54 लाख

341

मुंबईसह राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू केल्यानंतर मुंबईत आतापर्यंत तब्बल 84 हजार 210 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आल्याची माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली. या कारवाईत आतापर्यंत 4 कोटी 54 लाख इतका दंड वसूल करण्यात आल्याचे त्यांनी उत्तरात नमूद केले आहे.

राज्यात प्लॅस्टिकबंदी कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याबाबत पराग अळवणी, आशीष शेलार यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी वरील माहिती दिली. महाराष्ट्र प्लॅस्टिक व थर्माकॉल अविघटनशील वस्तूंचे (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हातळणी, साठवणूक) अधिसूचना 2018 नुसार महाराष्ट्र प्रदूषण नियत्रंण मंडळाने मुंबईतील 53 प्लॅस्टिक उत्पादकांना उत्पादन बंद करण्याचे आदेश देण्यात उत्तरात नमूद केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या