भांडुपमध्ये 622 वीजचोरांवर कारवाई

254

भांडुप परिमंडळात वीजचोरांचा सुळसुळाट सुरू आहे. त्याविरोधात महावितरणने धडक कारवाई सुरू केली असून 622 जणांकडून सुरू असलेल्या वीजचोरीचा भंडाफोड केला आहे. तसेच संबंधित वीजचोरांना आतापर्यंत 1 कोटी 85 लाख रुपयांची वीजचोरी केल्याचा ठपका ठेवत वसुली सुरू केली आहे. महावितरणच्या भरारी पथकाने भांडुप परिमंडळात महिनाभरापासून वीजचोरीविरोधात कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार 131 जणांनी वीज मीटरमध्ये छेडछाड करत वीजचोरी केल्याचे तर 491 जणांविरोधात थेट वीजचोरी केल्याचा ठपका ठेवला आहे. त्यानुसार त्यांनी सुमारे 14 लाख युनिट विजेची चोरी केल्याचा अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडून सदर विजेच्या बिलाची वसुली करण्यात येणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या