
कोरोनाला रोखण्यासाठी त्याचे निदान लककर होणे आणि रुग्णांना वेळेत उपचार मिळणे आवश्यक असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने आणखी 50 हजार अँटीजेन टेस्ट कीट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या आधी पालिकेने 1 लाख अँटिजेन टेस्ट कीट खरेदी केल्या असून आतापर्यंत 70 हजार लोकांची अँटिजेन चाचणी करण्यात आली आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी पालिका आरटी-पीसीआर पद्धतीने कोरोना चाचणी केली जाते. मात्र, या चाचणीने कोरोनाचे निदान व्हायला, 24 तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे कोरोनाचे निदान व्हायला तसेच त्यावर उपचार करण्यास बराच कालावधी लागतो. मात्र, अँटिजेन चाचणीमुळे केवळ 30 मिनिटांत कोरोनाचे निदान होते. त्यामुळे या चाचणीचा मोठा फायदा होत असल्याने पालिकेने अँटीजेन चाचण्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदा काढण्यात आली असून आठवडाभरात 50 हजार किट्स पालिकेला मिळतील, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश वाकाणी यांनी दिली आहे.
कोरोना मृत्यूचे प्रमाण कमी करता येणार
मुंबईत सुरुवातीला कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱयांचे प्रमाण काढले होते. या पार्श्वभूमीकर कोरोनाचे निदान लवकर व्हावे, यासाठी 30 मिनिटांत अहवाल देणाऱया अँटीजेन चाचणीचा पर्याय पालिकेने निवडला. त्यासाठी 1 लाख अँटीजेन किट्स खरेदी करण्यात आले. त्याची चाचणी उत्तर मुंबईतील कांदिवली, बोरिवली, दहिसर यासारख्या भागांत केली गेली. त्याचबरोबर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांवरही अँटिजेन चाचणी करण्यात आली. यातून मोठय़ा संख्येने रुग्ण शोधण्यास आणि त्यांना वेळेत उपचार सुरू करण्यास मदत झाली. कोरोनामुळे होणाऱया मृत्यूचे प्रमाणही रोखता आले. आता पालिकेकडे 30 हजार किट्स उरले असून ते संपण्याआधी नवीन किट्स खरेदी करणे गरजेचे असल्यामुळे आणखी 50 हजार किट्स खरेदी करणार असल्याचे काकाणी यांनी सांगितले.




























































