
मुंबईतील फुटपाथ मजबूत होण्यासाठी पेव्हरब्लॉकऐवजी स्टेन्सिल काँक्रीट वापरण्यात येणार आहे. फुटपाथ आणि चर भरण्याच्या कामासाठी हे मटेरियल वापरण्यात येणार आहे. यामुळे ठिकठिकाणी उखडणाऱया पेव्हरब्लॉकमुळे नागरिकांची होणारी गैरसोय दूर होणार आहे.
मुंबई महानगरपालिकेकडून दर्जेदार रस्ते आणि मजबूत फुटपाथसाठी कोटय़वधी रुपये खर्च केले जातात. मात्र अनेक वेळा फुटपाथवरील पेव्हरब्लॉक निघाल्याने खड्डे पडतात. तर काही वेळा रहिवासी, फेरीवाले यांच्याकडून पेव्हरब्लॉक काढण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे फुटपाथ मजबूत करण्यासाठी आणि चर भरण्याच्या कामांसाठी स्टेन्सिल काँक्रीट, प्लेन सिमेंट काँक्रीट किंका मार्बल चिप्ससह सिमेंट काँक्रीटने खड्डे बुजवण्याचे पर्याय वापरले जाणार आहेत. या नव्या उपक्रमात फुटपाथ मजबूत करण्यासाठी गुणवत्ता वाढवली जाणार आहे.
100 कोटींचा खर्च करणार
फुटपाथ सुधारणा उपक्रमात काहतूक बेटांकर बसकिले जाणारे पेक्हर ब्लॉकही बदलण्यात येणार असून त्या ठिकाणी दर्जेदार काँक्रीटचा वापर केला जाणार आहे. फुटपाथच्या सुधारणांसाठी नक्या धोरणानुसार 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे मुंबईकरांची गैरसोय दूर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.































































