
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामासाठी बीकेसीतील दोन मार्ग वळवण्यात आले आहे. या बदलामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा होत आहे. या प्रकल्पात बीकेसी टर्मिनस हे एकमेव भूमिगत मेट्रो स्थानक आहे. त्याच्या बांधकामाचे काम सुरू झाले आहे. या बांधकामासाठी बीकेसीतील 2 मार्ग पूर्णतः बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्यांचा खोळंबा होत आहे.
नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन टर्मिनसच्या या कामासाठी मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड आणि हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी यांना कंत्राट दिले आहे. सोमवारी या मार्गावरील वाहतुकीवर निर्बंध घालणारी वाहतूक अधिसूचना जारी करण्यात आली. या अधिसूचनेनुसार, एमएमआरडीए मैदानावर बीकेसी वाहतूक विभागाच्या कार्यक्षेत्रातील डायमंड जंक्शन ते जे.एस.डब्लू. कार्यालय आणि बीकेसी रोड प्लॅटिना जंक्शन ते मोतीलाल नेहरू नगर ट्रेड सेंटर हे मार्ग काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. हे आदेश 12/09/2023 ते 30/06/2024 पर्यंत लागू असेल.
या मार्गावरील वाहतूक इतर मार्गावर वळवण्यात आली असून वाहतूक कोंडी आणि इतर समस्यांचा आढावा घेतला जात आहे. तर बंद करण्यात आलेल्या मार्गांवर बॅरिकेटिंग करण्यात येणार आहे.
या मार्गावर नो एन्ट्री
एमटीएनएल जंक्शन, रज्जाक जंक्शन, कुर्ला, बीकेसी परिसरातून येणाऱ्या वाहनांना बीकेसी रोड डायमंड जंक्शनमार्गे डावे-उजवे वळण घेऊन खेरवाडी परिसरातील जेएसडब्ल्यू कार्यालयाकडे ‘नो एन्ट्री’ असेल.
खेरवाडी परिसरातून, एशियन हार्ट हॉस्पिटलमधून येणाऱ्या आणि जेएसडब्ल्यू ऑफिस/एमएमआरडीए ऑफिस/जे कुमार वॉर्डमधून डायमंड जंक्शन, बीकेसी भागात डाव्या-उजवीकडे टम घेऊन जाणाऱ्या वाहनांना ‘नो एन्ट्री’ असेल.
एमटीएनएल जंक्शन, रज्जाक जंक्शन, कुर्ला, बीकेसी परिसर, बीकेसी रोड स्ट्रीट नंबर १०, प्लॅटिना जंक्शन येथून मोतीलाल नेहरू नगर व्यापार केंद्राकडे डावे-उजवे वळण घेऊन येणाऱ्या वाहनांना ‘नो एन्ट्री’ असेल.
मोतीलाल नेहरू नगर ट्रेड सेंटर, बीकेसी फायर स्टेशनकडून प्लॅटिना जंक्शन आणि बीकेसी परिसरात येणाऱ्या वाहनांना ‘नो एन्ट्री’ असेल.
या पर्यायी मार्गाचा वापर करा
एमटीएनएल जंक्शन, रज्जाक जंक्शन, कुर्ला, बीकेसी परिसरातून बीकेसी रोड, डायमंड जंक्शन, जेएसडब्ल्यू कार्यालयातून खेरवाडी भागाकडे जाणारी वाहने डायमंड जंक्शन/नाबार्ड जंक्शन-उजवीकडे वळण-एशियन हार्ट हॉस्पिटल-जेएसडब्ल्यू कार्यालय आणि खेरवाडी परिसरातून पुढे जातील.
खेरवाडी परिसर-एशियन हार्ट हॉस्पिटल-जेएसडब्ल्यू कार्यालयाकडील वाहनांची वाहतूक नाबार्ड जंक्शनपासून बीकेसी क्षेत्राकडे डावीकडे वळण घेऊन पुढे जाईल.
एमटीएनएल जंक्शन, रज्जाक जंक्शन, कुर्ला, बीकेसी परिसरातून मोतीलाल नेहरू नगरच्या दिशेने जाणारी वाहने एमटीएनएल जंक्शन येथे डावीकडे वळण घेऊन त्यांच्या गंतव्यस्थानाकडे जातील.
मोतीलाल नेहरू नगर व्यापार केंद्राकडील वाहनांची वाहतूक आणि प्लॅटिना जंक्शन – बीकेसी क्षेत्राकडे जाणारी वाहतूक व्यापार केंद्राकडे डावीकडे-उजवीकडे वळण घेईल आणि एमटीएनएल जंक्शन मार्गे गंतव्यस्थानाकडे जाईल.


























































