सिटी सेंटर मॉलमध्ये कूलिंग ऑपरेशन सुरूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला गुरुवारी रात्री लागलेली भीषण आग तिसऱया दिवशी 38 तासांनंतर नियंत्रणात आली असली तरी रविवारी चौथ्या दिवशीही कूलिंग ऑपरेशन सुरूच आहे.

मॉलमध्ये असलेली एक हजारांवर इलेक्ट्रिक सामानाची दुकाने खाक झाली असून अजून संपूर्णपणे स्थिती पूर्ववत करण्यासाठी अजून पाच ते सहा दिवस लागणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

सिटी सेंटर मॉलमध्ये गुरुवारी रात्री 9च्या सुमारास आग लागली. ही आग इतकी मोठी होती की अग्निशमन दलाने लेव्हल-5 म्हणजेच ब्रिगेड काॅल असल्याचे जाहीर केले. दरम्यान, शनिवारी तिसऱया दिवशी आग पूर्णपणे नियंत्रणात आली असली तरी तब्बल दोन मजल्यांवरील हजारो दुकानांमधील इलेक्ट्रिक सामान असल्यामुळे मॉल पूर्वस्थितीत आणताना संबंधित दुकानाच्या मालकांना बोलावून काम सुरू आहे.