चिंचपोकळीत रंगणार मल्लखांबाचा थरार, यशवंत चषकासाठी 300 मल्लखांबपटू मैदानात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटना व मुंबई शहर जिल्हा मल्लखांब संघटना यांच्या मान्यतेने ‘यशवंत चषक’ निमंत्रित राज्यस्तरीय रोप मल्लखांब/मल्लखांब स्पर्धा शनिवार, 11 डिसेंबर आणि रविवार, 12 डिसेंबर असे दोन दिवस चिंचपोकळी येथील सुरेश आचरेकर क्रीडांगण येथे ‘ऋतुराज स्पोर्टस् ऍकॅडमी’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील अनेक नामांकित संस्थांच्या पुरुष व महिला संघांना निमंत्रित करण्यात आले आहे. या स्पर्धेत सुमारे 300 खेळाडूंचा सहभाग असेल. उद्या शनिवारी सायंकाळी 4 वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे. याचबरोबर पहिल्यांदाच एक आकर्षक अशी प्रदर्शनीय स्पर्धा 30 वर्षांवरील मल्लखांबप्रेमींसाठी आयोजित करण्यात आली असून त्यात माजी मल्लखांबपटू व इतर मल्लखांबप्रेमी यात सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना आयोजकांतर्फे आकर्षक पारितोषिके व प्रमाण पत्रे देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भायखळा विधानसभा आमदार यामिनी यशवंत जाधव यांच्या हस्ते होणार असून तद्प्रसंगी सिनेट सदस्य युवासेनेचे निखिल यशवंत जाधव, भायखळा विधानसभा संघटक विजय लिपारे, उमेश सीताराम नाईक, अध्यक्ष – चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती ऋतुराज स्पोर्टस् ऍकॅडमीचे सचिव ऋतुराज शिरोडकर यांनी दिली आहे.