
मुंबईत कोरोनाची तिसरी लाट आता पूर्ण नियंत्रणात येत असल्याचे समोर येत असून गेल्या काही दिवसांपासून पाच ते सहा हजार नोंद होणारी रुग्णसंख्या आज 3568 इतकी नोंदवली गेली आहे. दिवसभरात कोरोनामुळे दहा जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत करण्यात आलेल्या 49 हजार 895 चाचण्यांमध्ये हे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामधील 485 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले असून 76 जणांना ऑक्सिजनची गरज लागली आहे. तर एकाच दिवसात 231 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत सद्यस्थितीत 17,497 सक्रिय रुग्ण आहेत.
























































