प्रिस्क्रिप्शनशिवाय कोरोना चाचणी होणार; मुंबई महापालिका आयुक्तांनी दिली माहिती

643

कोरोनाची लक्षणे असल्याचा संशय असलेल्या व्यक्तीला डॉक्टराच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कोरोना चाचणी करता येणार आहे, अशी माहिती पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, संशयित रुण्गाचे कोरोनाचे निदान अधिक जलद व्हावे आणि कोरोना पॉझिटिव्ह असल्यास त्यावर तातडीने उपचार करता यावेत, यासाठी बुधवारी ‘आयसीएमआर’ने सर्व राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. त्यानुसार, मुंबईत आजपासून कोरोनाची चाचणी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय होणार असल्याची माहिती पालिका आयुक्त चहल यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या