मुंबईत लसीकरणाला वेग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या तिसऱया लाटेला रोखायचे असेल तर जास्तीत जास्त लसीकरण होणे गरजेचे आहे. म्हणूनच मुंबईत ठिकठिकाणी लसीकरणाला वेग आला आहे.

शिवसेना नगरसेविका गीता भंडारी यांच्या प्रयत्नाने शाखा क्रमांक 32 च्या वतीने नागरिकांसाठी रातोडी बाली रेसिडेन्सी येथील महापालिकेच्या आरोग्य केंद्रात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. या लसीकरण केंद्राचे उद्घाटन विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विभाग संघटक मनाली चौकीदार, माजी नगरसेवक उपविभागप्रमुख अजित भंडारी, मालाड विधानसभा संघटक अनिल भोपी आदी उपस्थित होते.

दहिसर-बोरिवली-मागाठणे विधानसभा मतदारसंघात शिवसेनेतर्फे विनामूल्य लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेचे उद्घाटन शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर व विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिला संघटक सुजाता शिंगाडे, नगरसेविका तेजस्वी घोसाळकर, मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर आदी उपस्थित होते.