मुंबईत आज पाच लाख कोविड लस येणार, परळच्या सेंटरमध्ये साठवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात होत असून मुंबईत 13 जानेवारी रोजी पाच लाख कोरोना लसीचे डोस येणार आहेत. कांजूर येथील प्रस्तावित स्टोरेज सेंटरचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्यामुळे परळच्या वॉर्ड ऑफिसमधील स्टोरेज सेंटरमध्ये या लसींची साठवणूक केली जाणार आहे. पुण्याच्या सिरम इन्स्टिटय़ूटकडून ही लस येणार आहे.

सर्वांना प्रतीक्षा लागून लाहिलेले कोरोना व्हॅक्सिनेशन लवकरच सुरू होणार असल्याने पालिकेने सर्व यंत्रणा तैनात ठेवली आहे. पालिकेने आतापर्यंत अडीच हजार वैद्यकीय कर्मचाऱयांना लसीकरणाचे ट्रेनिंग दिले आहे. लसीकरण केंद्रावर लसीकरणाची ‘रंगीत तालीम’ घेण्यात आली आहे. मुंबईत लस साठवणुकीसाठी कांजूर मार्ग येथे भव्य कोल्ड स्टोरेज सेंटर सुरू करण्यात येणार आहे. मात्र सद्यस्थितीत या कोल्ड स्टोरेज सेंटरचे काम पूर्ण झाले नसल्याने परळ येथे लस साठवण्यात येत असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. या ठिकाणी दहा लाख डोस साठवता येतील अशी व्यवस्था आहे. दरम्यान, मुंबईमधून सवा लाख आरोग्य कर्मचारी आणि इतर प्रंट लाईन वर्पर अशा 2 लाख लोकांची नावे कोवीन अॅपवर नोंदवण्यात आली आहेत. या दोन लाख जणांना कोविड लस पहिल्यांदा देण्यात येणार आहे.

या केंद्रांवर होणार लसीकरण

मुंबईत केईएम, नायर, सायन, कूपर, राजावाडी, व्ही.एन. देसाई, भाभा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी रुग्णालयांत लसीकरण केले जाणार आहे. बीकेसी येथील कोविड सेंटरमध्येही लसीकरण केले जाणार आहे. यानंतर पालिकेची रुग्णालये, दवाखाने, आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू केली जाणार आहेत. तसेच मुंबईत आगामी काळात मोठय़ा प्रमाणात लसीकरण करता यावे यासाठी पुढील काही महिन्यांत शाळांमध्ये आणि विभागातील सभागृहांमध्ये व्हॅक्सिनेशन सेंटर सुरू केली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

कामाठीपुऱयातही व्हॅक्सिनेशन सेंटर

पालिकेच्या ई विभाग भायखळाकडून कामाठीपुरा येथे गौराबाई दवाखान्यात कोरोना व्हॅक्सिनेशन सेंटर सुरू करण्यात येणार आहे. ओजोन इमारतीमधील दवाखान्यात व्हॅक्सिनेशनसाठी 15 युनिट तयार केले जात आहेत. कामाठीपुऱयात कोरोना वेगाने पसरण्याची भीती होती. मात्र पालिका प्रशासनाकडून या भागात विशेष खबरदारी घेण्यात आल्यामुळे कोरोना आटोक्यात आला. या भागातील रहिवाशांसह महिलांना कोरोना लस उपलब्ध करून देण्यासाठी व्हॅक्सिनेशन सेंटर सुरू करण्यात येत आहे.

सिरमकडून राज्याला 9 लाख 63 हजार डोसेस, कोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण; 511 लसीकरण केंद्र सज्ज

राज्यात कोरोना लसीकरणाची तयारी जय्यत सुरू आहे. आज सिरम इन्स्टिटय़ूटकडून राज्यासाठी लसीचे 9 लाख 63 हजार डोसेस मिळाले आहेत. आतापर्यंत कोविन पोर्टलवर 7 लाख 84 हजारांपेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱयांची नोंदणी झाली आहे.

राज्यात लसीकरणासाठी प्राधान्यक्रम ठरविण्यात आला आहे. पहिल्या गटात शासकीय व खासगी आरोग्य संस्थांमधील सर्व कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका या आरोग्य सेवा देणाऱया कर्मचाऱयांचा समावेश आहे. आरोग्य कर्मचाऱयांचे लसीकरणासाठी नऊ गटांत वर्गीकरण करण्यात आले आहे.

36 जिह्यांमध्ये 511 ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून पाठवलेल्या 1 हजार 200 व्हॅक्सिन पॅरियरचा पुरवठा जिल्हा व महापालिकांना करण्यात आला आहे.

कोविन पोर्टलवर आरोग्य कर्मचाऱयांची माहिती भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. लस टोचण्यासाठी 17 हजार 749 व्हॅक्सिनेटर्सची नोंदणी झाली आहे. 7 लाख 84 हजारपेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱयांची नोंदणी करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे व आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.