मुंबईत दिवसभरात 400 कोरोनामुक्त, 795 कोरोना रुग्ण, 8 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत बुधवारी दिवसभरात 795 कोरोना रुग्णांची नोंद झाली तर दिवसभरात 400 जण कोरोनामुक्त झाले. दरम्यान, मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी 365 दिवसांवर पोहोचला आहे.

मुंबईतील विविध रुग्णालयात कोरोवर उपचार घेत असलेल्या आणि दीर्घकालीन आजार असणार्‍या 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या 11 हजार 155 वर पोहोचली आहे. मुंबईत कोरोनामुक्त होणार्‍यांची एकूण संख्या 2 लाख 76 हजार 813 वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 93 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 365 दिवसांवर पोहोचला आहे.

राज्यात दिवसभरात 2,570 जण कोरोनामुक्त

कोरोनाविरोधात महाराष्ट्रभरात राबवण्यात आलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेला चांगले यश आले असून राज्यात बुधवारी दिवसभरात 2 हजार 570 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रिकव्हरी रेट 94.79 टक्क्यांवर पोहोचला आहे तर 4 हजार 382 कोरोना रुग्णांची नोंद झाली.