
कोरोनाविरोधात मुंबई महानगरपालिका राबवत असलेल्या विविध मोहिमांमुळे मुंबईत मंगळवारी दिवसभरात 537 कोरोना रुग्णांची नोंद झाली तर दिवसभरात 486 जण कोरोनामुक्त झाले. दरम्यान, मुंबईत कोरोना मृतांची संख्या आज दुपटीने कमी झाली असून 6 वर पोहोचली. मुंबईतील विविध रुग्णालयात कोरोवर उपचार घेत असलेल्या आणि दीर्घकालीन आजार असणार्या 6 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या 11 हजार 94 वर पोहोचली आहे. मुंबईत कोरोनामुक्त होणाऱयांची एकूण संख्या 2 लाख 71 हजार 870 वर पोहोचली आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी वाढून 375 दिवसांवर पोहोचला आहे.
























































