Mumbai crime news – डोंगरीतून दुचाकी चोरणारा जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पार्क केलेल्या दुचाकी चोरून पसार होणाऱ्या आजम बेलीप ऊर्फ सनी बचकाना या चोराला डोंगरी पोलिसांनी अटक केली. त्याने केलेले दुचाकीचे दोन गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले.

मुफद्दल सरिया हा तरुण डोंगरीतील एसव्हीपी रोड, चार नळच्या समोरील बाजूस एका दुकानात फ्राईड चिकन घेण्यासाठी रविवारी रात्री गेला होता. तेव्हा त्याने त्याची ऑक्टिव्हा दुचाकी पार्क केली व तो दुकानात गेला. माघारी आला असता गाडी नसल्याचे आढळून आले. त्याने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पथकाने घटनास्थळ परिसरापासून जे जे, नागपाडा, कामाठीपुरा, मुंबई सेंट्रल या परिसरामध्ये सीसीटीव्ही तपासणी करून चोरटय़ाची माहिती मिळवली आणि सापळा रचून त्याला पकडले.