
गौरी गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर कोकणात गेलेले चाकरमानी आता परतण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई गोवा महामार्गावर परतीला निघणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांची वर्दळ सुरू झाली आहे. माणगाव महामार्गावर चार ते पाच किमीच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या असल्या तरी वाहतूक संथ गतीने सुरू आहे. वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडीमुळे पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे.
गौरी गणपतीसाठी कोकणात गेलेले चाकरमानी 7 सप्टेंबर रोजी गौरी गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर आज मुंबईकडे येण्यास सुरुवात झाली आहे. लोणारे ते माणगाव या दरम्यान चाकरमानी प्रवाशाच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. मात्र वाहतूक कोंडी झालेली असली तरी वाहने हळूहळू पुढे सरकत असल्याने एका ठिकाणी वाहने थांबलेली नाहीत. त्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
मुंबई गोवा महामार्गावर माणगाव येथे वाहनांची वाहतूक कोंडी झाली असल्याने वाहतूक पोलिसांनी माणगाव निजामपूरमार्गे कोलाड तसेच पाली खोपोली मार्गे वाहतूक वळविण्यात आलेली आहे. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी सुटण्यास मदत झालेली आहे.



























































