गणपतीच्या एसटी आरक्षणाला फुल टू प्रतिसाद!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने कोकणात सोडलेल्या 2,200 जादा बसगाडय़ांपैकी 1,750 बसगाडय़ांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. यातही ग्रुप आरक्षणाला प्राधान्य मिळत असून 960 बसचे ग्रुप आरक्षण फुल्ल झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एसटीच्या ग्रुप आरक्षणाला फुल टू प्रतिसाद मिळत आहे.

ग्रुप बुकिंगचे आरक्षण 20 जुलैपासून उपलब्ध केले असून अन्य गाडय़ांचे आरक्षण हे 27 जुलैपासून सुरू झाले आहे. परतीच्या प्रवासासाठीही 7 ते 12 सप्टेंबर या कालावधीत कोकणातील स्थानिक बस स्थानकावरून जादा गाडय़ांची सोय केली आहे. गणेशोत्सवासाठी सोडण्यात आलेल्या जादा गाडय़ांपैकी आतापर्यंत 1,750 बसगाडय़ांचे आरक्षण पूर्ण झाले आहे. यातही ग्रुप बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.