पावसाची जोरदार बॅटिंग सुरूच! मध्य, हार्बर विस्कळीत; प्रवाशांचे हाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत आज सलग चौथ्या दिवशी मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने जनजीवन विस्कळीत झाले. रविवारी दुपारपासून काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर रात्रीपासून सोमवार दुपारपर्यंत पुन्हा जोर धरल्याने मध्य व हार्बर रेल्वे विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. दहिसर भागातही सलग तिसऱया दिवशी विक्रमी पाऊस झाल्याने दहिसर नदीला पूर आला. दरम्यान, पुढील चार दिवस मुंबईसह कोकण भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिल्याने पालिकेनेही सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मुंबईसह ठाण्यात होणाऱया पावसामुळे मध्य व हार्बर रेल्वे मार्गाला मोठा फटका बसला. मध्य रेल्वेची ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प होती. दुपारनंतर रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू झाली. मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग, लालबहादूर शास्त्र्ााr मार्गावर वाहतूककाsंडी झाली. मुलुंडच्या काही सोसायटय़ांच्या परिसरात पाणी शिरल्याचे प्रकार घडले. तर हिंदमाता, पश्चिम द्रुतगती महामार्ग, मिलन सब वे, चेंबूर येथील शेल कॉलनी, गांधी मार्पेट, वांद्रे, मालाड, दहिसर, बोरिवली, दादर, शीव, चुनाभट्टी, किंग्ज सर्कल आदी भागात काही वेळ पाणी तुंबले होते. दरम्यान, मुलुंड पूर्व नवघर व्हिलेज, लेन क्र. 2 येथे झाड अंगावर पडल्याने धनाजी अंबा हाथीयानी (31) हे जखमी झाले. त्यांना स्थानिक नागरिकांनी नजीकच्या हिरामोंगी खासगी रुग्णालयात दाखल केले. संघर्ष नगर इमारत क्रमांक-19 कुर्ला येथील दरडीचा दगड पडल्यामुळे जखमी झालेल्या दोघांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर कुर्ला कुरेशीनगर-कसाईवाडा या भागात दरडीचा काही भाग कोसळून तिघे जण किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले.

असा झाला पाऊस

  • शहर – 30. 69 मिमी
  • पूर्व उपनगर – 47.82 मिमी
  • पश्चिम उपनगर – 61.36 मिमी

अशी झाली पडझड

  • मुंबईत पूर्व उपनगरात 4, पश्चिम उपनगरात 1 अशा पाच ठिकाणी भिंती व भिंतीचा भाग कोसळला. यात कोणीही जखमी झालेली नाही.
  • शहरात 3, पूर्व उपनगरात 3 व पश्चिम उपनगरात 2 अशा 8 ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या.
  • शहरात 5, पूर्व उपनगरात 4 व पश्चिम उपनगरात 2 अशा 11 ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. यात कोणीही जखमी झालेले नाही.

चेंबूर, विक्रोळीमधील 175 नागरिकांचे स्थलांतर

चेंबूरच्या वाशीनाका भारत नगर येथील 8 घरांवर आणि विक्रोळी येथील सूर्यानगरमधील पंचशील चाळीतील 6 घरांवर व भांडुपमध्ये दरडीचा भाग कोसळून 30 जणांचा बळी गेल्याची दुर्घटना घडल्यामुळे सतर्कता म्हणून पालिकेने या भागातील 175 नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे.

भारत नगर, चेंबूर येथे दरडीचा भाग कोसळून 8 घरे पडली. आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने ढिगारा उपसण्याचे काम पूर्ण केले असून सुरक्षिततेच्या उपाययोजना म्हणून या ठिकाणच्या 38 खोल्यांमधील 140 ते 145 नागरिकांना एस. जे. केमिकल इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यांच्या खानपानाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर विक्रोळी येथील सूर्यानगर पंचशील चाळीतील दरडीचा भाग कोसळला. या भागातही ढिगारा उपसण्याचे काम पूर्ण झाले असून 30 नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात येथील एमव्हीआर महापालिका शाळेत स्थलांतरित केले आहे.