पीटर मुखर्जीच्या जामीन अर्जावर 16 जुलैला सुनावणी

15

सामना प्रतिनिधी। मुंबई

 शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जी याने तुरुंगातून आपली सुटका व्हावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे यांनी या प्रकरणाची सुनावणी 16 जुलैपर्यंत तहकूब करत जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांना पीटरच्या वैद्यकीय अहवालासह कोर्टात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

शीना बोरा हत्याकांडप्रकरणी आर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या पीटर मुखर्जीची बायपास सर्जरी झाली असून छातीत दुखत असल्याने आजारपणाचे कारण देत मुखर्जी याने सुटकेसाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर शुक्रवारी न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या