
मुंबईत रविवार रात्रीपासून सुरू झालेल्या जोरदार पावसाने सोमवारीही चांगलाच तडाखा दिला. मुंबई शहरापेक्षा उपनगरांमध्ये पावसाचा जोर जास्त होता. त्यामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या, तर अंधेरी सब वे तुंबल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. पावसामुळे तिन्ही रेल्वे मार्गांवरील रेल्वे वाहतूक खोळंबली, तर रस्ते मार्गाने जाणाऱया मुंबईकरांचीही रखडपट्टी झाली.
हवामान विभागाने मुंबई, ठाण्याला सोमवारी ऑरेंज अलर्ट दिला होता. त्यानुसार मुसळधार पावसाचा अंदाज खरा ठरला. मुंबईत सकाळी 9.19 मिनिटांनी समुद्राला भरती होती. याचवेळी संततधार पाऊस सुरू झाल्याने शहर व उपनगरांतील सखल भागात पाणी साचले. अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्याने सबवे बंद ठेवण्यात आला. येथील वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली. चेंबूर, घाटकोपर, विक्रोळी, शीव गांधी मार्पेट, विद्याविहार, चेंबूर शेल कॉलनी, चुनाभट्टी आदी सखल भागात पाणी साचले. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने पालिकेने लावलेल्या पंपामुळे पाण्याचा निचरा झाला.
पडझडीच्या घटना
मुसळधार पावसामुळे शहरात 2, पूर्व उपनगरांत 2 व पश्चिम उपनगरांत 4 अशा एकूण 8 ङ्गिकाणी झाडे व झाडांच्या फांद्या पडल्याच्या घटना घडल्या. यात कोणीही जखमी झालेले नाही.
पश्चिम उपनगरात झालेल्या जोरदार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये पाणी तुंबले. त्यामुळे या ठिकाणची वाहतूक बंद करून ती अन्य मार्गांवर वळवण्यात आली.
पावसाची नोंद
शहर 21.42 मिमी
पूर्व उपनगर 42.54 मिमी
पश्चिम उपनगर 44.92 मिमी
पावसाने अडवली मुंबईकरांची वाट…
पश्चिम द्रुतगती मार्गावर पावसामुळे मोठय़ा प्रमाणात वाहतूककाsंडी झाली. रस्त्यावरील खड्डे आणि पावसाची रिपरिप यामुळे या मार्गावर वाहनांच्या तब्बल दोन ते तीन किमी लांबीच्या रांगा लागल्या होत्या. एकीकडे रेल्वे मार्गावर रखडपट्टी टाळण्यासाठी रस्तेमार्गे जाणाऱया प्रवाशांना याचा मोठा फटका बसला.