हॉलीवूडकरांना प्रादेशिक भाषांची भुरळ

12

सामना प्रतिनिधी। मुंबई

गेल्या काही वर्षात हॉलीवूडने बॉलीवूडपुढे तगडे आव्हान निर्माण केले आहे. हॉलीवूडच्या अनेक सिनेमांनी त्याच दिवशी रिलीज झालेल्या बॉलीवूड सिनेमांपेक्षा जास्त कमाई केली आहे. आता हिंदुस्थानातील आपल्या सिनेमांचा बिजनेस वाढावा, सिनेमा अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा यासाठी आता हॉलीवूडकरांनी नवीन शक्कल लढवली आहे.

आगामी फास्ट ऍण्ड फ्युरिअस आणि हॉब्स ऍण्ड शॉ या सिनेमांचे ट्रेलर चक्क दहा भाषांमध्ये येणार आहेत. यात मराठीसह, हिंदी, तमीळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, गुजराती, भोजपुरी, पंजाबी, बंगाली आदी भाषांचा समावेश आहे. येत्या 2 ऑगस्टला ट्रेलर रिलीज होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या