मुंबई रुग्णालयातील कामगारांना भरघोस पगारवाढ मिळणार,भारतीय कामगार सेनेने केला करार

629

मरीन लाइन्सच्या मुंबई रुग्णालयातील कायम कामगारांना भरघोस पगारवाढ मिळणार आहे. त्यांच्या पगारवाढीचा करार मंगळवारी भारतीय कामगार सेनेकडून करण्यात आला. शिवसेना उपनेते आणि भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली चिटणीस शंकर मोरे आणि युनिट चिटणीस संजय सावंत तसेच इतर युनिट कमिटीने व्यवस्थापनाशी यशस्वी वाटाघाटी केल्या.

करारानुसार निवृत्त कामगारांना निवृत्तीनंतर वैद्यकीय सुविधा मिळणार आहेत. पॅकेजव्यतिरिक्त मिळणाऱ्या भत्त्यांमध्ये 75 टक्के वाढ मिळणार आहे. यात सी.आर्म, हिट रेडिएशन, कॅश भत्ता, ड्रिल भत्ता यांचा समावेश असेल. सफाई कामगारांना स्वेच्छेनुसार वॉर्डबॉय आणि आयाबाईपदी बढती मिळेल. ज्या कामगारांना सध्या 1.5 लाखाची मेडिक्लेम पॉलिसी लागू आहे त्यांना 1.5 लाखापेक्षा जास्त बिल झाल्यास सर्व खर्च व्यवस्थापनाकडून देण्याचे मान्य करण्यात आले आहे. करारावरील स्वाक्षरी कार्यक्रमाला रायगड जिह्याचे आमदार भरत गोगावले आणि जिल्हा परिषदेचे चंद्रकांत कळंबे उपस्थित होते. याशिवाय व्यवस्थापनातर्फे संचालक रमेश भट्टड, वैद्यकीय संचालक पाटील, युनिट कमिटीतर्फे राजू नायर, सुभाष जाधव, भाऊ मोरे, संजय चौकेकर, सुंदर चव्हाम, नागेश दळवी, दिलीप गायकवाड, जयेश तळेकर, हेमंत पाटणकर, मंजुळा वीर यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

कराराची काही ठळक वैशिष्टय़े

  • एल 1 ते एल 5 वर्गासाठी- 6800 रुपये
  • सी 1 ते सी 2 वर्गासाठी- 7100 रुपये
  • सी 3 ते सी 5 वर्गासाठी- 8300 रुपये
  • नवीन कामगारांची पीएल साठविण्याची मर्यादा 120 दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
  • 20 ते 25 सीएल मिळणाऱ्या कामगारांना स्वेच्छेने 5 सीएलचा मोबदला मिळणार आहे.
  • फेस्टिव्हल ऍडव्हान्सची मर्यादा 2029 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
  • सर्व वॉर्डेड महिलांना सी 3 मिळवून देण्याचे मान्य करण्यात आले.

या पगारवाढीच्या 60 टक्के रक्कम मूळ पगारात आणि 40 टक्के रक्कम इतर भत्त्यात विभागून देण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या