तुमचे मोबाईल कॉल रेकॉर्ड होत आहेत का? कसे ओळखाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपले बोलणे कोणी चोरुन ऐकत असेल तर ते आपल्याला अजिबात आवडत नाही. अशा वेळी आपण संबंधित व्यक्तीला खडे बोल सुनावत त्याची कानउघाडणी करतो आणि विषय तेथेच संपतो. पण जर कोणी तुमचे मोबाईल कॉल रेकॉर्ड करत असेल तर ? विचार केला तरी सामान्य व्यक्ती हादरते. म्हणूनच आधी आपले कॉल रेकॉर्ड होत आहेत का हे कसे ओळखायचे हे जाणून घेणे महत्वाचे.

एखाद्या व्यक्तीचे फोन कॉल रेकॉर्ड करणे हा हिंदुस्थानसह इतर देशांमध्ये कायदेशीर गुन्हा आहे. असे केल्यास समोरच्या व्यक्तीला शिक्षाही होऊ शकते. साधारणपणे सरकारी संस्था टेलीकॉम कंपन्यांच्या मदतीने कॉल रेकॉर्ड करतात. यामुळे आपला फोन कॉल रेकॉर्ड होतोय हे आपल्याला कळत नाही. पण तुम्ही सावधानता बाळगली तर तुमचा फोन टॅप होतोय का ते तुम्हांलाही कळेल. जर तुम्हांला कोणाचाही कॉल आला किंवा तुम्ही कोणालाही कॉल केलात तर काही सेकंदांतच तुम्हांला बीप असा आवाज एकू येतो. याचा अर्थ तुमचा फोन कॉल रेकॉर्ड होत आहे.

मोबाईल वारंवार गरम होत असेल तर सावध व्हा. प्रत्येक मोबाईलमध्ये एक सॉफ्टवेयर बसवण्यात आलेले असते. जे कॉल रेकॉर्ड दुसरीकडे पाठवण्याचे काम करत असते.यामुळेच मोबाईल सतत गरम होत असतो. तसेच जर तुमचा डेटा लवकर संपत असेल तर त्याकडेही दुर्लक्ष करू नका. वापर न करताच तुमचा डेटा संपत असेल तर डेटा चेक करणे गरजेचे आहे. यामुळे डेटा कसा संपला हे तुम्हाला कळेल. अनेकवेळा तुमचा कॉल रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्ती तुमचा डेटा वापरत असतात. कारण रेकॉर्डींग फाईल रिमोट सर्वर वरुनही डेटा सेंड केला जातो. तुम्ही कुठलेही अॅप डाऊनलोड केलेले नसेल तरीही नको असलेले पॉप अॅप अॅड आणि मेसेज जर तुमच्या मोबाईलवर येत असतील तर तुमच्या मोबाईलवर वॉच असल्याचे ओळखून जा. तसेच जर समजा अचानक मोबाईलचा बॅटरी ऑन होत असेल. मध्येच फोन बंद पडत असेल तर सावध व्हा. कारण कॉल रेकॉर्ड होत असताना देखील अशा प्रकारे मोबाईल बंद पडतो.