
माहेरून दीड लाख रुपये आणले नाहीत म्हणून संतापाच्या भरात पतीने आपल्या पत्नीची नायलॉनच्या दोरीने गळा आवळून हत्या केली. हा प्रकार आत्महत्या असल्याचा भास निर्माण करण्यासाठी पतीने तिचा मृतदेह पंख्याला लटकवला. तुषार सांबरे असे या निर्दयी पतीचे नाव असून बदलापुरातील या हुंडाबळीच्या प्रकाराने तीक्र संताप व्यक्त होत आहे.
वर्षभरापूर्वी तुषार याचे नेरळच्या जुम्मापट्टी भागात राहणाऱया कांचनबरोबर लग्न झाले. सोमवारी तो आपल्या सासऱयांकडे गेला आणि दीड लाख रुपयांची मागणी केली. मात्र हे पैसे देण्यास नकार दिल्याने त्याला प्रचंड संताप आला. रात्री उशिरा झोपेत असतानाच नायलॉनच्या रस्सीने पत्नी कांचन हिचा गळा आवळला. हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे भासावे यासाठी त्याने मृतदेह पंख्याला लटकवला. मात्र पोलिसांनी तुषार याला अटक केली असून त्याला तीन दिवसांची कोठडी दिली आहे.




























































