चला, सी लिंकवरून सायकल चालवूया…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदयान या हिंदुस्थानातील पहिल्या मल्टीस्टेज सायकल शर्यतीच्या निमित्ताने सायकलस्वारांना वांद्रे-वरळी सी लिंकवरून सायकल चालवण्याचा आनंद लुटता येणार आहे. शनिवार 18 फेब्रुवारीला सकाळी 11.30 ते दुपारी 2.30 या वेळेत मुंबईकरांना तसेच ठाणेकरांनाही ठाणे पालिका मुख्यालय ते मरीन ड्राइव्ह या आनंदस्वारीत भाग घेता येईल. ही शर्यत वांद्रे-वरळी सीलिंकमार्गे जाणार आहे. मात्र या शर्यतीसाठी प्रत्येकाला आपले नाव नोंदवावे लागणार असल्याची माहिती या शर्यतीचे संयोजक विष्णुदास चापके यांनी दिली.

5 फेब्रुवारीपासून राष्ट्रीय युद्ध स्मारक, नवी दिल्ली येथून सुरू झालेली सायकल शर्यत आग्रा, जयपूर, उदयपूर, अहमदाबाद, सुरतमार्गे प्रवास करून गुरुवारी ठाण्यात दाखल झाली. पुढे ती 19 फेब्रुवारीला ठाणे ते मुंबई आणि त्यानंतर मुंबई ते पुणे असा प्रवास होईल. नवी दिल्ली ते ठाणे सायकल चालवणाऱ्या हिंदयान सायकल टीममध्ये हिंदुस्थानी लष्कर आणि नौदलाच्या सायकलस्वारांचा समावेश आहे. स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंना https://forms.gle/jipC8buKWiVphHzR8 येथे नोंद करणे बंधनकारक आहे.