
आयपीएलमध्ये गेल्या 13 वर्षापासून सलामीचा सामना देवाला सोडण्याचा पायंडा यंदा मुंबई इंडियन्सने मोडीत काढला आहे. रविवारी वानखेडे मैदानावर झालेल्या लढतीत मुंबईने कोलकाता नाईट रायडर्स संघाचा 6 विकेट्सने पराभव केला.
कोलकाताने विजयासाठी दिलेले 221 धावांचे आव्हान मुंबईने 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. सलामीवीर रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन यांनी अर्धशतकी खेळी करत मुंबईला विजयी सलामी दिली. रोहितने 78 आणि रिकल्टनने 81 धावा चोपल्या. मुंबईकडून 3 विकेट्स घेणाऱ्या शार्दुल ठाकूर याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने वीस षटकांमध्ये 4 बाद 220 धावा केल्या. कर्णधार अजिंक्य रहाणे याने 67, अंगक्रिश रघुवंशी याने 51 धावांची खेळी केली. तर फिन ऍलन याने 37 आणि रिंकू सिंह याने 33 धावांचे योगदान दिले.






























































