Mumbai News – तांत्रिक बिघाडामुळे एअर इंडियाचे मुंबई-जोधपूर विमानाचे उड्डाण रद्द

मुंबईहून जोधपूरला जाणाऱ्या एअर इंडिया विमान उड्डाणादरम्यानच रद्द करण्यात आले. काही ऑपरेशनल समस्यांमुळे विमान उड्डाणादरम्यान थांबवण्यात आले. प्रवाशांना तात्काळ विमानातून उतरवून गेटवर परतण्यास सांगण्यात आले. यानंतर काही वेळाने प्रवाशांना दुसऱ्या विमानाने जोधपूरला रवाना करण्यात आले.

मुंबईहून जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान AI645 शुक्रवारी सकाळी 9.25 वाजता उड्डाण करणार होते. विमानाने टेकऑफसाठी पूर्ण वेग घेतल्यानंतर अचानक मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 2 वरील धावपट्टीवर थांबले. कॉकपिट क्रूने सुरक्षेच्या कारणास्तव टेकऑफ थांबवण्याचा निर्णय घेतला. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत, कर्मचाऱ्यांनी मानक कार्यप्रणालींचे पालन केले, असे एअरलाइनने म्हटले आहे.