
रस्त्यावर पार्क केलेल्या मोटारसायकल चोरणाऱ्या दोघांना मेघवाडी पोलिसांनी अटक केली. अमित तावडे आणि अहमद खान अशी त्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी 10 मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत.
जोगेश्वरी येथे राहणारे तक्रारदार यांनी गेल्या आठवडय़ात त्यांची मोटारसायकल इंदिरानगर येथे पार्क केली होती. दुसऱ्या दिवशी तक्रारदार हे कामावर जाण्यासाठी आले असता त्यांची मोटारसायकल जागेवर नव्हती. मोटारसायकल चोरीप्रकरणी मेघवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हय़ाची नोंद केली. वरिष्ठ निरीक्षक संजीव पिंपळे यांच्या पथकातील अधिकाऱयाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना अमितची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी अमितला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत त्याने मोटारसायकल चोरीची कबुली दिली. अमितच्या चौकशीत अहमदचे नाव समोर आले. त्यालादेखील पोलिसांनी अटक करून त्या दोघांकडून पोलिसांनी 10 चोरीच्या मोटारसायकल जप्त केल्या आहेत. चोरीच्या गुह्यात त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले आहे.
























































