
कुर्ला येथील ब्रिजवरून जाणाऱया प्रवाशावर अज्ञात व्यक्तीने चाकूहल्ला केल्याची घटना शनिवारी घडली. या हल्ल्यात फय्याज नेनपूरवाला हे जखमी झाले आहेत. घडल्या प्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करून तपासासाठी एक पथक तयार केले आहे. फय्याज हे मुंब्रा येथे राहतात. शनिवारी दुपारी ते कुर्ला रेल्वे स्थानक परिसर येथे आले होते. ते ओव्हर ब्रिजवरून जात असताना मागून आलेल्या एकाने फय्याजच्या पोटावर आणि छातीवर चाकूने वार करून पळ काढला. हा प्रकार समजताच कुर्ला रेल्वे पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी फय्याजला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. फय्याजवर उपचार सुरु आहे. घडल्या प्रकरणी पुर्ला रेल्वे पोलिसांनी फय्याजच्या भावाचा जबाब नोंदवून घेतला. हल्ल्याच्या घटनेनंतर कुर्ला रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेथे पोलिसांना एक बॅग सापडली. फय्याजवर हल्ला नेमका कोणत्या वादातून झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.


























































