सीएएविरोधात वकील कोर्टाबाहेर

332

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात सोमवारी मुंबई हायकोर्टाबाहेर वकिलांनी आंदोलन केले. संविधानाचे वाचन करून वकिलांनी या कायद्याचा निषेध केला. या आंदोलनात सुमारे पन्नासहून अधिक वकील सहभागी झाले होते. यामध्ये ज्येष्ठ वकील नवरोझ सिरवई, ऍड. गायत्री सिंह, ऍड. मिहीर देसाई, ऍड. अश्रफ शेख यांच्यासह इतर वकिलांचा समावेश होता.

आपली प्रतिक्रिया द्या