
लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा नकोच, अशी भूमिका मोटरमननी घेतली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने सावध भूमिका घेत पुढील दोन-तीन दिवसांत चर्चा केली जाईल असे स्पष्ट केले आहे. लोकल चालवत असताना लाल सिग्नल ओलांडणे, स्थानकातील थांबा विसरणे, वेग मर्यादेचे उल्लंघन करणे अशा चुका मोटरमनकडून घडतात. त्यामागील नेमक्या कारणांचा शोध घेता यावा, पुरावे मिळावेत यासाठी लोकलमधील मोटरमन आणि गार्ड केबिनच्या आत-बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत, मात्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे मोटरमननी त्यांच्या गोपनीयतेबद्दल रेल्वे कामगार संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे. त्याबाबत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे झालेल्या मोटरमनच्या बैठकीत सीसीटीव्ही कॅमेऱ्याला तीव्र विरोध करण्याची भूमिका घेतली आहे.

























































