
सामान प्रतिनिधी। मुंबई
प्रत्येक वेळी नवनवीन पद्धतीने गुन्हे करणाऱया दोघा सराईत चोरांच्या शिवडी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून अनेक गुह्यांची उकल करीत पोलिसांनी तब्बल आठ लाख 72 हजार किमतीचा चोरीचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत केला आहे.
शिवडी येथे जावेद मोनोद्दीन यांनी पार्क केलेल्या कारची काच फोडून गाडीतील लॅपटॉप, मोबाईल, आयपॉड, राऊटर असा लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला होता. या प्रकरणी मोनोद्दीन यांनी तक्रार दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुऱहाडे व पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण मांढरे तसेच विजय अवकिरकर, देठे, कदम, मोरे, साळुंखे या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. पोलिसांनी तांत्रिक बाबींचा अभ्यास करून खबऱयांना कामाला लावले. तेव्हा अशा प्रकारचे गुन्हे करणारा आरोपी सोनू बनिया कुमार (29) हा लोअर परळ परिसरात राहतो, अशी माहिती मिळताच पोलिसांनी त्याला पकडले. त्याने शिवडी येथील गुह्यातील एक लाख 10 हजार किमतीचा लॅपटॉप हस्तगत केला. याशिवाय सोनूने मालाड, व्ही.पी.रोड व भायखळा येथे केलेल्या गुह्यांची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्या गुह्यातील साडेतीन लाख किमतीचे आणखी सहा लॅपटॉप हस्तगत केले. त्यानंतर सोनूने चौकशीत त्याला चोरी करण्यासाठी मदत करणाऱया सुनील राजपूतचे नाव सांगितले. मग त्यानुसार पोलिसांनी कुर्ल्यात राहणाऱया सुनीलच्यादेखील मुसक्या आवळल्या. त्यानंतर पोलिसांनी शिवडी येथे केलेल्या गुह्यातील आयपॉड तसेच अन्य ठिकाणी केलेल्या गुह्यातील तीन लाख 96 हजार किमतीचे सात लॅपटॉप पोलिसांना दिले. अशा प्रकारे शिवडी येथील गुह्यातील आरोपींना पकडून पोलिसांनी अन्य पोलीस ठाण्यातील गुह्यांचीदेखील उकल करून तब्बल आठ लाख 72 हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत केल्याचे उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी सांगितले.
प्रत्येक वेळी गुह्याची पद्धत वेगळी
सोनू आणि सुनील दोघेही सराईत चोर आहेत. त्यांची गुह्याची पद्धत प्रत्येक वेळी वेगळी असते. ते कधी पार्क केलेल्या कारची काच फोडून आतील किमती मुद्देमाल लांबवतात. तर बंद घर फोडून ऐवज लंपास करतात. शिवाय बोलबच्चनगिरी करून लूटमारदेखील करतात, असेही करंदीकर यांनी सांगितले.

























































