ग्राहकांच्या स्वागतासाठी मुंबईतील मॉल्स सज्ज; ग्राहकांबरोबरच त्यांच्या चप्पल, बूटांचेही सॅनिटायझेशन करून प्रवेश

595

लॉकडाऊनपासून बंद राहिलेले मुंबईतील मॉल्स बुधवारपासून ग्राहकांसाठी खुले होत आहेत. त्यासाठी मॉल्सवाल्यांनी आतील सर्व दुकाने आणि परिसराचे सॅनिटायझेशन केले आहे. ग्राहकांच्या सुरक्षेचीही पुरेपूर काळजी घेण्यात आली असून त्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

तब्बल चार महिन्यांनंतर मॉल्स सुरू होणार आहेत. मास्क घालून आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळूनच ग्राहकांनी मॉलमध्ये यावे आणि आत प्रवेश केल्यानंतरही एकमेकांपासून सुरक्षित अंतर पाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेशद्वारावरच प्रत्येक ग्राहकाची तपासणी करून नंतरच त्यांना आत सोडले जाणार आहे. ग्राहक आणि कर्मचार्‍यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेण्यात येणार असल्याचे रिटेलर्स असोसिएशनने म्हटले आहे.

फिनिक्स, इन्फिनिटी, आर-सिटी, इनऑर्बिट, ग्रोकेल्स, सोबो सेंट्रल ब्रॅन्ड फॅक्टरी आदी मॉल्सनी आपल्या वेबसाईटकरच सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत माहिती दिली आहे.

अशी आहे तयारी

  • मास्क घालूनच प्रवेश
  • प्रवेशद्वारावर स्वयंचलित टेम्परेचर स्कॅनिंग
  • लिफ्टमध्ये फक्त 3 व्यक्तींनाच प्रवेश
  • पार्किंगमध्ये डिस्टन्सिंगची सुविधा
  • ग्राहकांजवळी पिशव्यांचे यूव्ही सॅनिटायझेशन
  • शॉपिंग बॅग्जच्या सॅनिटायझेशनसाठी यूव्ही बॉक्स
  • चप्पल, बुटांच्या सॅनिटायझेशनसाठी सॅनिटायझेशनमॅट्स
आपली प्रतिक्रिया द्या