
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईवरील ‘26/11’ च्या दहशतवादी हल्ल्याच्या दशकपूर्ती वर्षात त्या हल्ल्यात शहीद झालेले जवान आणि पोलिसांना आदरांजली वाहण्यासाठी आयोजित केलेल्या मानवंदना दौडमध्ये 8000 हून अधिक धावपटू सहभागी झाले. आयडीबीआय फेडरल लाइफ इन्शुरन्सने द सी हॉक्सच्या सहकार्याने आयोजित केलेली ही मानवंदना दौड मुंबईतील एनएससीआय येथून सुरू झाली. आयडीबीआय फेडरल लाइफ इंन्शुरन्सचे सीएमओ रमण कार्तिक, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि पब्लिक कंसर्न फॉर गव्हर्नन्स ट्रस्ट या सेवाभावी संस्थेचे संस्थापक जुलिओ रिबेरो, आंतरराष्ट्रीय टेनिसपटू पुरव राज, सिने अभिनेत्री तारा शर्मा, जीओसी लेफ्टनंट जनरल पराशर, नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडियाचे प्रेसिंडेंट जयंतीलाल शहा, दौडच्या संयोजिका मयांक व्यास सिंग आदी मान्यवरांनी 21 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 3 किलोमीटर अंतराच्या दौडना हिरवा झेंडा दाखवला.




























































