मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची स्थापना केलेल्या संस्थेचे 125व्या वर्षात पदार्पण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

1 ऑगस्ट 1898 रोजी गिरगावात 124 वर्षांपूर्वी मुंबईतील ज्या 11 तरुण मंडळींनी मराठी ग्रंथ संग्रहालयाची स्थापना केली होती, त्या संस्थेने नुकतेच 125 व्या वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्ताने दादर येथील संग्रहालयांच्या शारदा मंगल कार्यालयात ‘स्मरण-स्मृती समारंभ’ मराठी संशोधन पत्रिकेच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय विशेषांकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्या प्र. ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले यांच्या हस्ते होऊन शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचा उत्साहाने प्रारंभ करण्यात आला. या समारंभाचे अध्यक्ष अनुवादक चंद्रकांत भोंजाळ होते तर प्रमुख वक्ते म्हणून मराठी संशोधन मंडळाचे संचालक डॉ. प्रदीप कर्णिक होते. संग्रहालयाचे प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.