
‘तुझं माझं अरेंज मॅरेज’ या मराठी चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच जुहूमधील एका कार्यक्रमात लॉंच करण्यात आला. या चित्रपटात सयाजी शिंदे,अभिजीत चव्हाण, सुनील गोडबोले, अभिलाषा पाटील, बिपीन सुर्वे, प्रीतम कागणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याबाबत निर्माते अमित तिळवणकर म्हणाले, जेव्हा दोन कुटुंबे लग्न जुळविण्यासाठी एकत्र येतात तेव्हा तो प्रसंग जगातील सर्वात सुखद गोष्टींपैकी एक असतो. मुलाने किंवा मुलीने त्या अख्ख्या कुटुंबाविरोधात जाणे किती बरोबर असते? तुमचे पालक किंवा कुटुंबीय तुमच्यासाठी नेहमीच योग्य असा निर्णय घेतात असा संदेश याद्वारे दिला आहे.





























































