
मुंबई पोलिसांनी मिंधे गटाच्या नेत्याला 50 लाखांच्या खंडणी प्रकरणात अटक केल्याची बातमी समोर येत आहे. मुंबईतील एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिंधे गटाचे माजी नगरसेवक कमलेश राय यांच्यावर एका बांधकाम प्रकल्पाच्या ठेकेदाराकडून 50 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे, साम टीव्हीने याबाबत वृत्त दिलं आहे.
साम टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका बांधकाम साइटवरून कमलेश राय यांनी 50 लाख रुपयांची खंडणी मागितली. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करता आहेत.





























































