मुंबईला पाणीपुरवठा करणारा मोडकसागर तलाव ओसंडून वाहू लागला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई शहरासाठी जीवनवाहिनी असलेला तसेच वर्षभर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख सात तलावांपैकी एक असलेला मोडकसागर तलाव आज रात्री 9.24 वाजता ओसंडून वाहू लागला आहे. गतवर्षी हा तलाव 26 जुलै 2019 रोजी भरुन वाहू लागला होता. तर त्या आधीच्या वर्षी दिनांक 15 जुलै 2018 रोजी ओसंडून वाहू लागला होता.