हत्या, हत्येचा प्रयत्न व बलात्कार आदी गंभीर गुह्यांतील आरोपी गजाआड, युनिट-9ची कारवाई

murder-knife

वांद्रयाच्या नर्गिस दत्त नगर झोपडपट्टीत राहणाऱ्या एका तरुणाच्या डोके आणि हातावर धारदार सुऱ्याने गंभीर वार करून पसार झालेल्या दोघा रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट-9 च्या पथकाने डोंबिवलीत जाऊन पकडले. त्यातील आकाश जाधव हा शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील आरोपी आहे.

28 फेब्रुवारी रोजी रिझवान शफी कुरेशी (28) हा घराशेजारी बसलेला असताना दोघा अज्ञात इसमांनी त्याच्यावर गंभीर वार करून पळ काढला. या हल्ल्यात जखमी झालेल्या रिझवानला उपचारासाठी शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच युनिट-9 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामदास कदम, विजेयंद्र अंबावडे तसेच अंमलदार सचिन राऊत, प्राजक्ता धुमाळ या पथकाने तपास सुरू केला. तेव्हा या गुह्यातील दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरचे असून ते डोंबिवली येथे पळून गेल्याची खबर अंमलदार सचिन राऊत यांना मिळाली. त्यानुसार गोपाळे यांनी आणखी खोलात जाऊन तपास केल्यावर दोघेही डोंबिवली येथे असल्याचे स्पष्ट होताच पथकाने तेथे जाऊन आकाश जाधव आणि अंकित नाईक या दोघा गुन्हेगारांना पकडले. या दोघांविरोधात विविध पोलीस ठाण्यांत अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून आकाश हा शक्ती मिल बलात्कार

 

आपली प्रतिक्रिया द्या