मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आता आटोक्यात आली असली तरी म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या मात्र वाढत असल्याने टेन्शन वाढले आहे. मुंबईतील रुग्णांची संख्या 478 वर गेली असून 57 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 17 जण मुंबईतील आहेत. एकूण रुग्णांमध्ये 144 रुग्ण मुंबईतील असून 334 रुग्ण पालिका कार्यक्षेत्राबाहेरील असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. म्युकरमायकोसिस रुग्णांवर पालिकेच्या केईएम, नायर, शीव आणि कूपर रुग्णालयासह खासगी रुग्णालयांतही उपचार सुरू आहेत.
आतापर्यंत 81 जणांना डिस्चार्ज
म्युकरमायकोसिसवर प्रभावी असणारे इंजेक्शन एम्पह्टेरेसिन-बी लॅपोझोम आणि टॅबलेट पोसोकोनेझोल वापरले जात आहेत. शिवाय सहाय्यक उपचार केले जात आहे. त्यामुळे प्रकृतीत सुधारणा झाल्याने आतापर्यंत 81 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
अशी आहे सद्यस्थिती
- मुंबईतील एकूण सक्रिय रुग्ण – 347
- पालिका रुग्णालयांत उपचार सुरू – 210
- खासगी रुग्णालयांत उपचार सुरू – 137




























































