कास्ट्राईब एसटी कर्मचारी संघटनेचा आज वर्धापनदिन

कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचा 45 वा वर्धापनदिन गुरुवारी दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे साजरा होणार आहे. संघटनेचे अध्यक्ष धर्मपाल ताकसांडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी 11.30 वाजता भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते होणार आहे.